नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची भेट नाहीच; परराष्ट्र मंत्रालय

नवी दिल्ली- पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सोहेल महमूद यांच्या भारतभेटीनंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची भेट होईल अशी चर्चा सुरु होती. शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत १३-१४ जून रोजी ही भेट होणार होती.

मात्र, बिश्केक येथे होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांची कोणत्याही प्रकारची भेट होणार नाही. असे परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रविशकुमार यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.