“नरेंद्र मोदी-अमित शहा’जोडीचे नेटकऱ्यांकडून कौतुक !

अजय शिंदे

फोटोंवर ग्राफिक्‍सची कमाल
जम्मू काश्‍मीरच्या निर्णयामुळे सोशल मीडियावर हजारो लाईक आणि कमेंट

सातारा – जम्मू आणि काश्‍मीर राज्याला स्वायत्त दर्जा देणारे राज्यघटनेतील कलम 370 हटविण्याची शिफारस केंद्र सरकारने केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या “जोड गोळी’चे नेटकऱ्यांनी सोशल मीडियावरून तोंड भरुन कौतुक केले आहे.

मोदी सरकारच्या काही मोठ्या निर्णयांनी सामान्य माणसांचीही मने जिंकली आहेत, असे मागील साडेपाच वर्षात असे पाहायला मिळालेआहे. जम्मू आणि काश्‍मीर याबाबत देशातील सर्वच नागरिक नाजूक भावनांनी बांधलेले आहेत. त्यातच आज मोदी सरकारने जम्मू आणि काश्‍मीर राज्याला स्वायत्त दर्जा देणारे कलम 370 हटविण्याची शिफारस केल्याने सोशल मिडियावरील फेसबुक, व्हॉटसऍप, इंस्टाग्राम, ट्विटर या माध्यमांवर “मोदी-शहा’ या जोडगोळीचे कौतुक करताना नेटकऱ्यांनी अगदी मनमुराद आनंद लुटला. आता देश परिपूर्ण एक झाला, अशा भावनेचा पाऊस सोशल मीडियाने अनुभवला.

या पोस्टपैकी भारताचा नकाशा आणि त्यावर भगवा फेटा अशी सुरेख सांगड घालत त्याला “आता संपूर्ण भारत झाला’ अशी टॅगलाईन असलेल्या पोस्टने तर वाहवा मिळवली. या पोस्टला लाईक तर मिळाल्याच शिवाय त्या मोठ्या संख्येने शेअरही झाल्या. काही पोस्टमध्ये मोदी लष्कराच्या गणवेशात असून ते लष्कराच्या जवानांना संबोधित करताना दिसत आहेत आणि त्याचे शीर्षक “हा तोच माणूस आहे÷, ज्याने 370 हटवले’ या पोस्टलाही हजारो लाईक आणि शेअर मिळाल्या.
सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा जम्मूमध्येच लष्कराच्या सराव मोहिमेत सहभागी झाला आहे आणि तो सध्या इथेच सेनेच्या कर्तव्यावर हजर आहे. 370 हटवण्याच्या शिफारशीनंतर या योगायोगाला नेटकऱ्यांनी हटके प्रतिसाद दिला.

महेंद्रसिंग धोनीचा “पायगुण’!
महेंद्रसिंग धोनी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्तांदोलनाच्या या छायाचित्राखाली “योगायोग म्हणजे धोनी सध्या कश्‍मीरमध्ये ! पायगुण हो!!’ असा योगायोगाचा मुलामा देऊन धोनीच्या पायगुणाचे कौतुक केल्याचे दिसून आले.


मोदींच्या जुन्या आंदोलनाच्या फोटोंवर कमेंटची धूम

मोदी यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा फोटो केंद्र सरकारच्या आजच्या निर्णयाशी संबंध लावून पाहिले जात आहे. नरेंद्र मोदी फार पूर्वीपासून कलम 370 ला विरोध करत आले असून आता पंतप्रधान बनल्यानंतर शेवटी त्यांनी ते हटवण्याचा निर्णय घेतलाच, असे या फोटोद्वारे दाखवण्यात येत आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)