महाराष्ट्र स्वाभिमानी पक्ष भाजपमध्ये विलीन करणार
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांचा अखेर भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. एवढेच नाही तर त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षदेखील भाजपमध्ये विलीन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच नारायण राणे यांचे पुत्र नितेश आणि निलेश हे दोघेही भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
सध्या नारायण राणे हे भाजपचे सहयोगी सदस्य असून राज्यसभेचे खासदार आहेत. नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर ते अधिकृतरीत्या आणि औपचारिकरीत्या भाजपवासी होणार आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नारायण राणे यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, नारायण राणे यांनी भाजपमध्ये रहायचे की नाही हा निर्णय येत्या दोन आठवड्यात सांगणार असल्याचे काही दिवसांपुर्वीच म्हटले होते.