सिंधुदुर्ग: भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं आज सिंधुदुर्गात उद्घाटन झाले आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन झाले आहे. यावेळी शाह यांनी राणे यांच्यावर भाजपमध्ये अन्याय होणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपचे अनेक नेते उपस्थित होते.
नारायण राणे जिथे अन्याय होतो तिथे निडरपणे संघर्ष करतात. राणे यांना त्यांच्या राजकीय आयुष्यात अनेकवेळा अन्यायाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांनी अन्यायाला वाचा फोडत मार्गक्रमण केले. त्यामुळे त्यांची राजकीय कारकिर्द फार हिरतीफिरती असल्याचे शाह यांनी म्हटले. शाह पुढे म्हणाले की, राणेंवर तुमच्याकडे अन्याय झाला तर? मी सांगितलं, भाजपम्यये त्यांच्यावर अन्याय होणार नाही. नारायण राणे यांना कसं साभाळाचं आणि त्यांचा सन्मान करायचा, ते भाजपला माहिती आहे.
सर्वात आधी मी या भूमीवर पाय ठेवून या मातीला स्पर्श करुन धन्य झालो. जेव्हा मुघलांचं राज्य होतं, औरंगजेबाचं राज्य होतं, तेव्हा चहुबाजूने अंधार होता. त्यावेळी शिवाजी महाराजांनी स्वराज्याची भाषा करत संपूर्ण देशाला चेतना दिली. तेव्हापासून सुरु झालेली ही यात्रा पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत सुरू आहे. शिवाजी महाराज आपल्या जीवाची बाजी लावून स्वधर्मासाठी लढले. भारतात सर्वात पहिले नौसेना बनवण्याचं काम शिवाजी महाराजांनी याच पवित्र भूमित केल्याचे अमित शाह यांनी म्हटले.