भाजप लवकरच सत्ता स्थापन करणार – नारायण राणे

मुंबई: भाजप सत्ता स्थापन करण्यास प्रयत्नशील असून मी भाजपला सर्वतोपरी मदत करणार, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. राणे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी गेले होते. बाहेर आल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राणे म्हणाले, राज्यपालांकडे १४५ आमदारांच्या पत्रासह जाऊ शिवसेना काँग्रेसबरोबर जाईल असं वाटत नाही. राज्यावर राष्ट्रपती राजवट लागणे, याला शिवसेना जबाबदार आहे. “मी सत्तास्थापन करण्यासाठी भाजपला मदत करणार असल्याचं सांगतो आहे. मात्र, मी जास्त माहिती देणार नाही, नाहीतर येणारेही यायचे थांबतील”असेही राणे म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here