पुत्र प्रेमापोटी राणे करणार भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेसची मनधरणी

प्रातिनिधिक छायाचित्र

कॉंग्रेसला रामराम ठोकून वेगळा पक्ष स्थापन करणारे नारायण राणे यांनी भाजपच्या कोट्यातून खासदारकी मिळवली. शिवसेना व राणे कट्टर शत्रू आहेत. आता भाजपनं शिवसेनेशी युती केल्यामुळे राणे यांच्या स्वाभिमानी पक्षाला कोकणात फटका बसेल. आपल्या मुलाला तरी भाजपच्या मदतीनं निवडून आणण्याचा त्यांचा प्रयत्न होता; मात्र युतीच्या जागावाटपात त्यांना स्थान नसल्यानं राणे अडगळीत पडले आहेत. आघाडीत जाणार नाही, असं ते एकीकडे म्हणतात; पण दुसरीकडं त्यांचा पाठिंबा घेणार, असंही सांगतात. आता त्यांनी शिवसेनेच्या विरोधात पाच जागी उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्गसह राज्यातील इतर मतदारसंघात महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. मात्र आम्ही भाजपच्या मोदीं सोबतच आहोत एनडीएमधील आम्ही घटक पक्ष आहोत. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात माजी खासदार निलेश राणे यांची उमेदवारी महाराष्ट्र स्वाभिमान तर्फे आम्ही जाहीर केली आहे. त्यांना भाजप राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा द्यावा यासाठी या पक्षांच्या जिल्हाध्यक्षांची आम्ही संपर्क साधणार असल्याची माहिती खा. नारायण राणे यांनी येथे दिली.

राणे म्हणाले राज्यात शिवसेना आणि भाजप या पक्षातील फक्त नेत्यांमध्ये युती झालेली आहे. कार्यकर्त्यांचे मनोमिलन झालेले नाही. त्यामुळे येथे शिवसेनेचा उमेदवार असेल तेथे भाजपचे कार्यकर्ते विरोधात मतदान करतील तर जेथे भाजपचा उमेदवार असेल तेथे शिवसेनेचे कार्यकर्ते विरोधात मतदान करतील. याचा निश्‍चितपणे फायदा महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या उमेदवारांसह कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवारांना होणार आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उमेदवार स्वतंत्रपणे निवडणूक लढणार असले तरी आम्ही मोदींसोबत आहोत.लोकसभा निवडणुकीनंतर देखील मोदींनाच आमचा पाठिंबा असणार आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)