मुंबई – केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ह्रदयासंदर्भातील त्रास होत असल्यामुळे त्यांना आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्रक्रिया करण्यात आली आहे.
ही शस्रक्रिया यशस्वी झाली असून नारायण राणे यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी सोडण्यात येणार असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.
नारायण राणे यांना हृदयविकाराचा त्रास आहे. मुंबईतील लिलावती रुग्णालयात त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली असून शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे, अशी माहिती डॉक्टरांनी दिली. रुटीन चेकअपसाठी ते आज लीलावती रुग्णालयात गेले होते. यावेळी तपासणीमध्ये हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या शिरांमध्ये काही ब्लॉकेजेस आढळले होते. यामुळे लगेच शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला.
नारायण राणे यांच्या हृदयासंदर्भातील शस्त्रक्रियेदरम्यान एक स्टेन टाकला गेला आहे. यानंतर आणखी एक स्टेन टाकण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.