नारायण राणेंचे शिवसेना-भाजपवर टीकास्त्र !

रत्नागिरी: माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शिवसेना-भाजपवर जोरदार टीका केली आहे. दोन्ही पक्ष सत्ता व पैशासाठी एकत्र आल्याचे राणेंनी म्हटले आहे. तसेच त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर देखील टीका केली आहे.

नारायण राणे म्हणाले, शिवसेना-भाजपने साडेचार वर्षात काहीच विकासकामे केली नाहीत. त्यामुळे लोकांचे लक्ष दुरीकडे वळविण्यासाठी भांडले. आणि निवडणूका जवळ येताच एकत्र आले, हे सत्तेसाठी स्वार्थीपण असल्याचे राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गांधीनगरला गेले होते. यावर हा उद्धव ठाकरेंचा दुतोंडीपना असल्याची टीका राणेंनी केली.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×