मुंबई – शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगाव येथील नेस्को सभागृहात सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे यांनी भाषणातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना विशेष लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. अमित शहा यांना आव्हान देण्याची तुमची लायकी आहे का? असा थेट सवाल राणे यांनी उद्धव ठाकरेंना केला. ( narayan rane on uddhav thackeray )
उद्धव ठाकरे यांनी गोरेगावात बोलताना अमित शहा यांना ऊद्देशून केलेल्या वक्तव्यांवर बोलताना राणे यांनी, “उद्धव ठाकरे यांनी अमित शहाचा दौरा एवढा का झोंबला? मुंबई दौरा अमित शहा गृहमंत्री आहेत देशात कुठेही जाऊ शकतात. उद्या महानगरपालिकेत निवडणूक लागली तिथेही येऊ शकतात. पक्षासाठी तुम्हाला झोंबायचं कारण काय? चांगल्या शब्दात बोलतायेत नाही उद्धव ठाकरे म्हणतात अमित शहा म्हणाले यांना जमीन दाखवा याचा अर्थ त्यांना कळला नाही. शहा यांनी जमिनीवर या असं म्हणायचं होत. आम्ही अमित शहा यांना आसमान दाखवू कोणाच्या जीवावर म्हणता उद्धव ठाकरे?” असा सवाल केला. ( narayan rane on uddhav thackeray )
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
उद्धव ठाकरे म्हणाले, मुलं पळवणारी टोळी आपण ऐकली आहे. पण सध्या महाराष्ट्रात बाप पळवणारी अवलादी फिरत आहेत. एवढी वर्षे आपण सर्वांनी ज्यांना सत्तेचं दूध पाजले, आता त्याच लोकांनी तोंडाची गटारगंगा उघडली आहे. मुंबईवर गिधाडं फिरायला लागली, लचके तोडणारी औलाद फिरायला लागली आहे. मुंबई तोडायची आहे त्यांना. लचके तोडायला तुम्ही देणार का? असा सवाल शिवसैनिकांना करत अमित शहांना आव्हान केले. त्यांनी शिवसेनेला जमीन दाखवली, आपण त्यांना आस्मान दाखवू. त्यांना माहिती नाही की इथं जमिनीतून फक्त गवाताची पाती येत नाही तर, तलवारीच्याही पाती येतात.
मी गिधाडं हा शब्द मुद्दाम वापरला आहे, कारण निवडणूक आल्यावर त्यांना मुंबई दिसते. पण जेव्हा मुंबईवर संकटं येतात, तेव्हा ही गिधाडं कुठे असतात? यांच्यासाठी मुंबई ही केवळी विकण्यासाठी मिळालेली स्वेअर फुटातील जमीन असेल. पण ही आमच्यासाठी केवळ जमीन नाही, मातृभूमी आहे. 105 वीरांनी बलिदान देऊन मिळवलेली मातृभूमी आहे, असेही ठाकरेंनी ठणकावून सांगितले. ( narayan rane on uddhav thackeray )