नवी दिल्ली – लघु, छोटे आणि मध्यम उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी या क्षेत्रातील उत्पादकता वाढवण्यासाठी कसोशिचे प्रयत्न हाती घेण्याची सूचना या खात्याचे मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. या क्षेत्रातच देशाची निर्यात व जीडीपी वाढवण्याची क्षमता आहे असेही राणे यांनी म्हटले आहे.
त्यासाठी मंत्रालयातील सर्व घटकांनी एकमेकांशी ताळमेळ राखून काम केले पाहिजे अशी सुचनाही त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे. आपल्या मंत्रालयातील एका बैठकीत बोलताना त्यांनी ही सुचना केली.
सरकारने हस्तक्षेप करून या क्षेत्रासाठी आता अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे या उद्योग क्षेत्राची नेमकी गरज भागण्यास मदत होणार आहे. त्यातून या क्षेत्राचा विकास साधणे शक्य होणार आहे असेही त्यांनी म्हटले आहे.