नारायण बारणे यांचा भाजपमध्ये प्रवेश 

पिंपरी  – पिंपरी चिंचवड महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजपाच्या नगरसेविका माया बारणे यांचे पती माजी नगरसेवक संतोष बारणे यांनी नुकताच राष्ट्रवादीत प्रवेश केला. असे असताना शुक्रवारी (दि. 3) त्यांचे बंधु नारायण बारणे व पुतणे रोहित बारणे यांनी मात्र भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तसेच वाकड मधील युवा कार्यकर्ते विक्रम कलाटे व अभिजीत गायकवाड यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

बालेवाडी येथे एका हॉटेलमध्ये हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व आमदार लक्ष्मण जगताप यांचे उपस्थितीत बारणे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह प्रवेश केला.

यावेळी पिंपरी विधानसभेचे प्रभारी सदाशिव खाडे, नगरसेवक विलास मडिगेरी, भाजपाचे प्रदेश चिटणीस अमित गोरखे, गणेश गुजर आदी उपस्थित होते. या प्रवेशासाठी चिंचवड विधानसभेचे प्रभारी संतोष कलाटे व विशाल कलाटे यांनी पुढाकार घेतला.

महापालिकेची आगामी सार्वत्रिक निवडणूक 2022 मध्ये होत आहे. त्यानुषंगाने त्यांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा भाजपा मध्ये झालेला प्रवेश वाकड आणि थेरगाव भागात भाजपासाठी फायदेशीर ठरणारा आहे. याशिवाय येणाऱ्या काळात अजूनही बरेच कार्यकर्ते व काही विद्यमान नगरसेवक भाजपामध्ये प्रवेशासाठी संपर्कात आहेत. यांचा सुध्दा भाजपामध्ये योग्य वेळ पाहून प्रवेश होणार आहे. त्यामुळे आगे आगे देखो, होता है क्‍या असा सूचक इशारा याबाबत बोलताना सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.