मुंबई – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र राजकीय वातावरण दिसत आहे. सर्वच पक्षांचे नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी नवीन वेगवेगळ्या क्लृप्ती करत आहेत. अशातच नरसिंह यादव हे काँग्रेसच्या पक्षाच्या प्रचारामध्ये सामील झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. नरसिंह यादव हे सध्या पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यामुळे पोलीस दलात कार्यरत असून सुद्धा काँग्रेसच्या प्रचारात सामील झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Police have lodged an FIR against wrestler Narsingh Yadav who is serving as an Assistant Commissioner of Police in Maharashtra after he campaigned for the #Congress party on April 21. (file pic) #LokSabhaElection2019 pic.twitter.com/jy40Va3osT
— ANI (@ANI) April 23, 2019
नरसिंह यादव यांनी नवी दिल्ली येथे २०१० मध्ये झालेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्णपद मिळवून दिले होते. पोलीस दलात कार्यरत असून देखील नरसिंह यादव यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा प्रचार करत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्यांच्याविरोधात अंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
https://twitter.com/sanjaynirupam/status/1120027039292018688