मुंबई – राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या महाराष्ट्र शाखेतर्फे जपानमध्ये विधानमंडळ सदस्यांचा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी नरहरी झिरवळ आणि त्यांच्या पत्नी जपानला गेले होते. त्यांचा विमानतळावरचा अंगात सदरा, धोतर. डोक्यावर गांधी टोपी आणि पायात चपला अशा पेहराव आणि सोबत त्यांची पत्नीही नऊवारी, कपाळाला कुंकू, गळ्यात पोत आणि पायात वाहाना घातलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत होता. त्यांच्या साधेपणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात.
नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत केला डान्स (Video) pic.twitter.com/4Yl66K4gzm
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) May 21, 2023
अशात नरहरी झिरवळ पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओत त्यांनी पत्नीला खांद्यावर घेऊन संबळ वाजवलं आणि डान्सही केला. नरहरी झिरवळ यांनी पत्नीला खांद्यावर घेत डान्स केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. संबळ हाती घेत त्यांनी ठेका धरला.
दरम्यान, नेटकऱ्यांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. पक्ष कोणताही असो, पण या साधेपणाचं मनमोकळं कौतुक केलंच पाहिजे, अशा प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.