अल्पवयीन मुलीवर बलात्कार प्रकरणी नराधमाच्या जन्मठेपवर शिक्कामोर्तब

मुंबई : मोबाईलमध्ये गाणी दाखविण्याच्या बहाण्याने 5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या 29 वर्षाच्या नराधमाला सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्‍कामोर्तब केले.

न्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी ही शिक्षा कायम ठेवली आणि बलात्कार करणाऱ्या दोषींला कठोरात कठोर शिक्षा व्हायलाच हवी असे स्पष्ट केले.
ठाणे जिल्ह्यात राहणाऱ्या बाबूराव उर्फ सांगर धूरी या आरोपीने एप्रिल 2015 साली शेजारच्या 5 वर्षीय मुलीला मोबाईल मध्ये गाणी दाखवण्याच्या बहाण्याने घरी बोलावले व तिच्यावर अत्याचार केले.

ही घटना शेजाऱ्यांना कळताच शेजारच्यांनी आरोपीच्या घरी जाऊन त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. तसेच घडलेला प्रसंग मुलीच्या घरच्यांना सांगितला.
पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत सत्र न्यायालयाने जून 2018 मध्ये आरोपीला 10 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. या शिक्षेविरोधात आरोपीने मुंबई उच्च न्यायालयात अपील केले होते.

त्या अपीलावर उभयपक्षांच्या युक्‍तीवादानंतर न्यायालयाने अशा व्यक्‍ती समाजासाठी घातक असतात आणि म्हणूनच आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, हे असे मत व्यक्‍त करताना आरोपीचे वय पहाता त्याला त्याच्या कृत्याचे दुष्परिणाम माहित होते. त्यामुळे त्याला सुधारण्याची संधी देण्याचा प्रश्‍नच उदभवत नाही, असे स्पष्ट करत अपील फेटाळून लावले.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.