आळंदीतील ‘त्या’ नराधम महाराजाला कोठडी

आळंदी – स्वतःच्या खासगी वारकरी शिक्षण संस्थेत शिकत असलेल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलावर संस्थाचालक महाराजानेच अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केल्याची धक्‍कादायक घटना आळंदीत उघडकीस आली असून या नराधम महाराजावर गुन्हा दाखल करून शुक्रवारी (दि. 9) अटक केली आहे.

त्यास खेड न्यायालयाने बुधवार (दि. 14) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, अशी माहिती आळंदी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर यांनी दिली.

लहू अर्जुन गायकवाड (रा. सिद्धेबेट, मूळ गाव जांगलादेवी, घनसांगवी, जि. जालना) असे कोठडी सुनावलेल्या महाराजाचे नाव आहे. आळंदीतील वारकरी शिक्षण संस्थेतील अल्पवयीन मुलाला या नराधमाने बांधकाम सुरू असलेल्या असलेल्या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर नेऊन जीवे मारण्याची धमकी देत अनैसर्गिक कृत्य करीत अत्याचार केला. त्यानंतर महाराजाचे गैरप्रकार समोर आले. या घटनेचा पुढील तपास आळंदी पोलीस करीत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.