सिनसिनाटी टेनिस स्पर्धेत नाओमीचे आव्हान संपुष्टात

-ऍश्‍ले बार्टी उपान्त्य फेरीत

-दुखापतीमुळे ओसाकाची माघार

सिनसिनाटी – सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धेतील महिला विभागाच्या उपान्त्यपूर्व फेरीत ऍश्‍ले बार्टीने मारिया सक्‍कारीचा 5-7, 6-2, 6-0 असा पराभव करत उपान्त्य फेरीत प्रवेश केला. तर, अन्य एका सामन्यात द्वितिय मानांकित नाओमी ओसाकाला गुडख्याच्या दुखापतीमुळे सोफिया केनिन विरुद्धचा सामना मध्येच सोडावा लागल्याने तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

यावेळी महिला गटातील उपान्त्यपुर्व फेरीतील पहिल्या सामन्यात ऍश्‍ले बार्टीला पहिल्या गेमपासून दबावात ठेवण्यात मारिया सक्‍कारीला यश आले होते. त्यामुळे बार्टीला पहिल्या सेटमध्ये पॉइंट्‌स मिळवण्यात अडचणी येत होत्या. त्याचाच फायदा घेत मारियाने आक्रमक खेळ करण्यावर भर दिला. त्यामुळे बार्टीने पहिला गेम 5-7 अशा फरकाने गमावला.

यावेळी पहिला सेट गमावल्यामुळे बार्टी काहीएशी दडपणात आली होती. मात्र, दुसऱ्या सेट मध्ये बार्टीने आपल्या लौकिकास साजेसा खेळ करत पहिल्या गेम पासून दडपण झुगारुन देत आक्रमक खेळ केला. त्यामुळे इतका वेळ आक्रमक खेळ करणारी मारिया दबावात आलेली पहायला मिळाले. यावेळी दुसऱ्या सेटमध्ये बार्टीने मारियाला एकही गेम पॉइंट मिळवू दिला नाही. त्यामुळे बार्टीने हा सेट 6-0 अशा फरकाने आपल्या नावे केला.

तर, तिसऱ्या सेटमध्ये पुन्हा बार्टीने दुसऱ्या सेटची पुनरावृत्ती करत मारियावर वर्चस्व गाजवले. यावेळी तिसऱ्या सेट मध्ये मारियाने पुनरागमनाचा प्रयत्न करत थोडाफार प्रतिकार केला. मात्र, तिसरा सेटही बार्टीने 6-2 अशा फरकाने आपल्या नावे करत उपान्त्यफेरीत धडक मारली.

तर, दुसऱ्या सामन्यात लईत असलेल्या नाओमी ओसाका समोर सोफिया केनिनचे आव्हान होते. यावेली सामन्यातील पहिला सेट ओसाकाने 6-4 असा एकतर्फी आपल्या नावे केला होता. त्यामुळे सामना ओसाका सहज जिंकेल असे वाटत असतानाच सोफियाने पुनरागमन करत दुसरा सेट 1-6 असा एकतर्फी आपल्या नावे करत सामन्यात सनसनाटी निर्माण केली.

यावेळी सामन्याच्या दुसऱ्या सेट दरम्यानच ओसाकाच्या गुडघ्यात चमक येत होत्या. मात्र, तीने तिसरा सेट खेळण्याचा निर्णय घेतला. यावेळी तिसऱ्या सेटमध्ये ओसाका 2-0ने आघाडीवर असताना तीच्या गुडघ्यातील चमक जास्तच वाढल्याने तीने सामन्यातून माघार घेतल्याने सोफियाला विजयी घोषित करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.