लंडन – जागतिक महिला टेनिसमधील स्टार टेनिसपटू नाओमी ओसाका हिने पायाला झालेल्या दुखापतीमुळे ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेतील सर्वात मानाची समजली जात असलेल्या विम्बल्डन स्पर्धेतून माघार घेतली आहे.
खरेतर या स्पर्धेत क्रमवारीचे गुणही दिले जाणार नसल्याने ही स्पर्धा केवळ प्रेक्षणीयच ठरणार आहे. पायाला दुखापत झाल्याने मी सहभागी होणार नाही असे सध्यातरी चित्र आहे, असेही ओसाकाने म्हटले आहे.
या स्पर्धेतून तिने सलग दुसऱ्या वर्षी आपला सहभाग नाकारला आहे. चार ग्रॅंडस्लॅम विजेती असलेल्या ओसाकाने ओसाकाला गेल्या महिन्यात फ्रेंच खुल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत अमांडा अनिसिमोव्हाकडून 7-5, 6-4 असे पराभूत व्हावे लागले होते. त्या सामन्यादरम्यान पायाच्या दुखापतीवर वेदनाशामक औषध घेत खेळल्याचे ओसाकाने सांगितले. मी या स्पर्धेत खेळण्याबाबत अजून निर्णय घेतलेला नाही. मात्र, सध्याची परिस्थिती पाहता मी खेळण्याची शक्यता कमीच आहे,असे ओसाका म्हणाली.