ओसाकाला ऑस्ट्रेलियन ओपनचे विजेतेपद

सिडनी – जपानच्या नाओमी ओसाकाने ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात चेक प्रजासत्ताकची पेट्रा क्विटोवाचा 7-6, 7-5, 6-4 असा संघर्षपूर्ण पराभव करत स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. या विजयाबरोबर ओसाका ऑस्ट्रेलियन ओपन जिंकणारी पहिली आशियाई खेळाडू ठरली आहे.

ओसाका विरूद्ध क्विटोवामध्ये झालेल्या अंतिम लढतीत पहिला सेटमध्ये 7(7)-6(2) असा टायब्रेक झाला. यामुळे या सामन्यात चुरस पाहायला मिळाली. यानंतर क्विटोवाने दुसऱ्या सेटमध्ये 7-5 अशी आघाडी घेतली. ही आघाडी मोडत ओसाकाने अखेरच्या सेटमध्ये 6-4 असा क्विटोवाचा पराभव केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या विजयानंतर ओसाकोने डब्ल्यूटीए रॅकिंगमध्ये पहिले स्थान पटकावले आहे. 21 वर्षीय ओसाका महिला एकेरी प्रकारात वर्ल्ड रॅकिंगचे पहिले स्थान पटकवणारी पहिली आशियाई खेळाडू ठरली आहे. तसेच ओसाका डेन्मार्कच्या केरोलीन नंतर मानांकनात पहिले स्थान मिळवणारी सर्वात तरूण खेळाडू ठरली आहे. यापूर्वी मागील वर्षी म्हणजेच 2018 मध्ये अमेरिका ओपन जिंकणारी ओसाका ही पहिली जपानी खेळाडू ठरली होती. आता आणखी एक किताब तिने जिंकला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)