जपान खुल्या टेनिस स्पर्धेत नाओमी ओसाका अंतिम फेरीत

टोकियो: युवा खेळाडू नाओमी ओसाकाने पॅन पॅसिफिक जपान खुल्या टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीकडे वाटचाल केली. तिने बेल्जियमच्या एलिसी मर्टन्सचा 6-4, 6-1 असा दणदणीत पराभव केला.

अग्रमानांकित ओसाकाने फोरहॅंडचे ताकदवान फटके व अचूक सर्व्हिस असा चतुरस्त्र खेळ केला. तिने पहिल्या सेटमध्ये दहाव्या गेमच्या वेळी सर्व्हिसब्रेक मिळविता पासिंग शॉट्‌सचा उपयोग केला. दुसऱ्या सेटमध्ये तिने आक्रमक फटक्‍यांचा खेळ करीत दोन वेळा सर्व्हिसब्रेक मिळविला. शेवटच्या चार गेम्स घेत तिने हा सेट मिळविला.

अंतिम फेरीत ओसाकाची रशियाच्या ऍनास्ताशिया पॅव्हलिउचेन्कोवा हिच्याशी गाठ पडणार आहे. पॅव्हलिउचेन्कोवाने उपांत्य फेरीत जर्मनीच्या अँजेलिक कर्बरचा 6-3, 6-3 असा पराभव केला. तिने क्रॉसकोर्ट फटक्‍यांचा बहारदार खेळ केला तसेच तिने बिनतोड सर्व्हिसचाही उपयोग केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)