मुंबई : ‘मोदींना मी मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असे विधान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले होते. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर अनेक भाजप नेते, कार्यकर्त्यांनी निषेध करत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
राज्यातील विविध ठिकाणी गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपचे आंदोलन सुरु आहे. तर दुसरीकडे भंडारा पोलिसांनी कथित मोदी गावगुंडाला ताब्यात घेतले आहे. भाजप मूळ मुद्याला बगल देण्यासाठी विषयाचा आणि वाक्याच्या अर्थाचा अनर्थ करत असल्याचे नाना पटोले यांनी म्हंटले आहे.
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले !
पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में,
खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले ! #ModiHaiToMumkinHai #modiJiJiyoHazaroSaal @narendramodi @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis pic.twitter.com/y4JLNyrmho— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) January 18, 2022
मात्र त्यांच्या या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील उडी घेतली आहे. अमृता फडणवीस यांनी नाना पटोलेंवर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाल्या अमृता फडणवीस
सूरज को डुबाने का इरादा रखते है कुछ नन्हे पटोले ! पर इल्म नहीं है उन्हें के इस प्रगति की रोशनी को बुझाने की होड़ में, खुद ही जल जाएँगे ये लाइलाज फफोले !