नांदुर : देशात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. दरम्यान, दौंड तालुक्यातील नांदुरच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला.
73 व्या स्वातंत्र्य दिना निमित्त शाळेतील कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सरपंच लता थोरात यांची उपस्थिती होती. तर कार्यक्रमास उपसरपंच कैलास गायकवाड, तलाठी किशोर परदेशी यांच्यासह ग्रामस्थ देखील उपस्थित होते.