नांदेड : राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. त्यातच मागील काही दिवसांपर्यंत ग्रीन झोन मध्ये असणाऱ्या नांदेडची आता रेड झोन कडे वाटचाल सुरु झाल्याचे दिसत आहे. कारण आज सकाळी समोर आलेल्या आकडेवारीनुसार आता नांदेडची शंभरीकडे वाटचाल सुरु झाली आहे.
नांदेड शहरात रविवारी आणखीकाही जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यात १३ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यापैकी ९ रुग्ण प्रवासी आहेत. १ रुग्ण करबला भागातील आहे. २ जण अबचलनगर, नांदेड येथील रहिवासी आहे. १ जण बारड येथील रहिवासी असून तो बारड येथील शासकीय रूग्णालयात दाखल आहे. या १३ जणांमुळे आता शहरातील कोरोनाबाधितांची रुग्ण संख्या झाली ९७ वर पोहचली आहे. त्यातील २६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे त्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तसे पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून दोन फरार झाले आहेत. दरम्यान, ६४ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत.