नांदेड हिंसाचार : एसपीला वाचवण्यासाठी अंगरक्षकाने झेलला तलवारीचा वार

'होला मोहल्ला' कार्यक्रमात मिरवणुकीवेळी शीख तरुणांचा पोलिसांवर हल्ला, ४ पोलीस गंभीर जखमी

नांदेड :  नांदेडमध्ये कोरोनाला रोखण्यासाठी 4 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आल्यानं होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या होला मोहल्ला मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. होला मोहल्ला कार्यक्रमास शीख धर्मियांमध्ये विशेष महत्त्व आहे.

 

यंदा वाढत्या कोरोनामुळे शीख बांधवांचा हल्ला मोहल्ला कार्यक्रम प्रशासनाने रद्द केला होता. याला गुरुद्वारा समितीनेही सहमती दर्शवली होती. मात्र, काही उत्साही तरुणांनी प्रशासनाचे आदेश धुडकावत सायंकाळी पोलिसांनी सुरक्षेसाठी लावलेली बॅरिकेंटींग तोडत होला मोहल्ला कार्यक्रम केला. यादरम्यान तरूणांची पोलिसांशी झटापट झाली. यावेळी जमावाने पोलिसांवर हल्ला चढवला आणि पोलिसांच्या वाहनांची प्रचंड तोडफोड केली. यात चार पोलीस 4 जखमी झाल्याचं नांदेडचे पोलीस अधिक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी सांगितलं आहे.

या पोलिसांवर हल्ल्यावेळी, हल्लेखोरांनी थेट पोलीस अधीक्षकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला केला. मात्र पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांच्यावर झालेला हल्ला त्यांचे अंगरक्षक दिनेश पांडे यांनी आपल्या अंगावर झेलला. या हल्ल्यात दिनेश पांडे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना काल रात्री रूग्णालयात दाखल करून तात्काळ त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी सगळेजण प्रार्थना करत आहेत.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.