नांदेड – नांदेड शहरात प्रेमप्रकरणातून तरुणीचा भरदिवसा गळा कापून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी व पीडितेचे पाच-सहा वर्षापासून प्रमे संबध होते. मात्र या दोघांचे ब्रेकअप झाले त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
वैष्णवी गौर वय,22 असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव असून सुरेश शेंडगे, वय 26 असे आरोपी प्रियकराचे नाव आहे. नांदेड शहरातील शारदानगर भागात ही घटना घडली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आरोपी सरेश यास पोलिसाांनी अटक केली आहे.
वैष्णवी व सुरेश यांचे गेल्या पाच ते सहा वर्षापासून प्रेमसंबध होते. मात्र मध्यंतरी या दोघामंद्ये दुरावा निर्माण झाला. यामधून वैष्णवी बाहेर पडली मात्र सरेशला ब्रेकअप सहन झाला नाही. त्यामुळे संतापलेल्या सुरेशने आपल्या पाच वर्षाच्या प्रेमाचा शेवट केला. आरोपी सुरेशने वैष्णवीच्या घरी कुणी ही नसताना घरात घुसून तिचा निघृणपणे चाकूने गळा चिरून खून केला.