नांदेड – सोलापूर विभागातील भालवानी ते वाशिंबे दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरु आहे. नॉन इंटर लॉक वर्किंग हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. यापैकी नांदेड विभागातुन धावणारी पनवेल एक्स्प्रेस काही दिवस रद्द करण्यात आली आहे. ऐन उत्सवाच्या काळात नांदेड-पनवेल-नांदेड रेल्वे रद्द करण्यात आल्याने प्रवासी संतापले आहेत.
नांदेड ते पनवेल एक्स्प्रेस : हुजूर साहिब नांदेड येथून निघणारी गाडी नं. 07614 पनवेल एक्स्प्रेस दिनांक 14 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे. तसेच गाडी नं. 07613 पनवेल ते नांदेड एक्स्प्रेस : पनवेल येथून निघणारी पनवेल एक्स्प्रेस दिनांक 15 ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
दरम्यान, सध्या दसरा, दिवाळी सण उत्सवाचे दिवस सुरु आहेत. बीड, परभणी, नांदेड भागातील अनेक नागरिक कामानिमित्त पुणे, मुंबई ठिकाणी वास्तव्यास आहेत. सणानिमित्त गावी जाण्यासाठी रेल्वे हा उत्तम पर्याय निवडला जातो. मात्र, ऐन उत्सवकाळात रेल्वे सेवा 14 दिवस बंद ठेवण्यात आल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.