नांदेड – देगलूर- बिलोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनाचे वृत्त शुक्रवारी सायंकाळी व्हायरल झाले होते. पण, ही अफवा असल्याचं समोर आलं आहे.
दरम्यान, आमदार अंतापूरकर यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मुंबई येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबद्दल वृत्त सातत्यानं समोर येत आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आमदार अंतापूरकर यांना श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या पोस्ट शेअर केल्या होत्या. पण, ही अफवा असल्याचं कळताच त्यांनीही ट्विटर, फेसबुकवरून या पोस्ट डिलीट केल्या आहेत.