अशोक चव्हाणांनी घडवलं परिवर्तन; नांदेड जिल्हा बँक निवडणुकीत भाजपचा धुव्वा

नांदेड :  काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीने नांदेड जिल्हा बँकेवर झेंडा फडकवला. निवडणुकीत महाविकास आघाडीच्या पॅनेलला निर्विवाद बहुमत प्राप्त झालं. 21 पैकी 17 जागांवर यश मिळवत अशोक चव्हाणांनी परिवर्तन घडवले.

सत्ताधारी भाजपला चारच जागांवर समाधान मानावं लागलं. भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा विजय झाला असला, तरी भाजपच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. महाविकास आघाडीतील काँग्रेस 12, शिवसेना 1, तर राष्ट्रवादी 4 जागांवर विजयी झाली. यापैकी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील, शिवसेनेचे नागेश पाटील आष्टीकर तर भाजपचे भास्करराव पाटील खतगावकर हे आधीच बिनविरोध निवडून आले होते.

अशोक चव्हाण आणि प्रतापराव चिखलीकर लोकसभा निवडणुकीनंतर प्रथमच आमनेसामने आले होते. या निवडणुकीत दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र यावेळी चव्हाणांनी बाजी मारत लोकसभेच्या पराभवाचा वचपा काढला. लोहा मतदारसंघातून भाजप खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर विजयी झाले, तर कंधार मतदारसंघातून त्यांचे पुत्र प्रवीण पाटील चिखलीकर यांनीही बाजी मारली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.