नांदेड(प्रतिनिधी) – कोरोना विषाणू संदर्भात शनिवार 16 मे 2020 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातील माहितीनुसार 14 व 16 मे रोजी पाठविण्यात आलेल्या स्वॅब पैकी 374 रुग्णांचा अहवाल रविवारी(17मे) रात्री उशिरा प्राप्त झाला आहे. त्यामध्ये नवीन 13 रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 97 वर पोहचली आहे.
रविवारी नवीन 13 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 9 रुग्ण प्रवासी असून 1 रुग्ण करबला भागातील तर 2 रुग्ण अबचलनगर भागातील आहे व ग्रामीण बारड येथील 1 रुग्ण आहे. सदरील रुग्णांपैकी 12 पुरुष (अनुक्रमे वय वर्ष 13, 14, 14, 19, 24, 25, 30, 37, 44, 50, 74) तसेच 1 स्त्री ( वय वर्ष 57) आहेत. सदरील रुग्ण या रुग्णांवर यात्री निवास एनआरआय भवन व बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये औषधोपचार सुरु आहेत.
नांदेड जिल्ह्यात 97 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 26 रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. उपचार सुरु असलेल्या 64 रुग्णांपैकी- 8 रुग्ण हे डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, तसेच पंजाब भवन कोवीड केअर सेंटर व यात्री निवास कोवीड केअर सेंटर येथे- 54 रुग्ण व बारड ग्रामीण रुग्णालय येथील धर्मशाळेत कोवीड केअर सेंटरमध्ये- 2 असून औषधोपचार सुरु आहेत.
औषधोपचारास प्रतिसाद न दिल्यामुळे एकुण पॉझिटिव्ह 5 रुग्णांचा मृत्यू झाला असून या रुग्णांना रक्तदाब, मधुमेह या आजाराने बाधित होते. या आजाराने बाधित रुग्णांनी विशेष काळजी घ्यावी. कोरोना बाधित रुग्ण हे करबला, अबचलनगरात पुन्हा आढळून आले आहेत. संपर्कातील एक जण बारडला बाधित झाल्यामुळे नांदेड मध्ये कोरोनाचे संक्रमण वाढत जात आहे, ही चिंतेची बाब झाली आहे.