कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील कवठे येमाईच्या श्रीमती नंदाबाई बन्सी नरसाळे यांचा सुसंगत फाउंडेशन पुणे तर्फे राज्य स्तरीय आदर्श माता पिता पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
प्रसिद्ध साहित्यिक आणि संत साहित्याचे आणि लोकसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक मा.डॉ.रामचंद्र देखणे यांच्या शुभहस्ते नंदाबाई यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी राज्यातील ४२ आदर्श मात्यापिताना राज्यस्तरिय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
गरीबीमुळे जेमतेम शिक्षण हाती असलेल्या नंदाबाई बन्सी नरसाळे यांनी पतीच्या निधनानंतर अत्यंत प्रतिकूल परस्थितीत २ मुलींना उच्चशिक्षित करून त्यांच्या पायावर उभे केले. आज त्यांच्या दोन्ही मुली शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत पुण्याच्या सुसंगत फाउंडेशनने नंदाबाई बन्सी नरसाळे यांचा राज्य स्तरीय आदर्श मातापिता पुरस्कार देऊन गौरव केला.
जेष्ठ विचारवंत,माजी आमदार उल्हासदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास सुसंगत फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ सुधाकर न्हाळंदे उपाध्यक्ष धोंडिराम गडदे, दि कॉसमॉस को ऑप बँकेचे उपाध्यक्ष अँड प्रल्हाद कोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.