नाणार रिफायनरी प्रकल्प अखेर रद्द, राज्य शासनाची घोषणा

मुंबई – अखेर नाणार प्रकल्प आज रद्द झाला. खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द करण्याच्या अधिसुचनेवर सही केली. त्यानंतर उद्योगमंत्री आणि शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्प रद्द झाल्याची घोषणा केली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर युती करायची असेल तर आधी नाणार प्रकल्प रद्द करा अशी अट शिवसेनेने ठेवली होती. तसेच नाणार प्रकल्पाला स्थानिकांनी सुध्दा विरोध केला होता.

आज मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीची महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांना आश्वासन दिल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केला व तशी अधिसूचनाही काढली अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहेत.

तसेच आता नाणार प्रकल्पासाठी घेतलेल्या राजापूर आणि देवगड तालुक्यातील 16 गावांमधील शेतकर्‍यांच्या जमिनी त्यांना परत केल्या जाणार आहेत अशी घोषणा देखील सुभाष देसाई यांनी यावेळी केली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)