नाना पटोलेंना नितीन गडकरींचा आशीर्वाद ! कोण राखणार गड ?

नागपूर: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वारे चांगलेच वाहू लागले आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्राचे ५ उमेदवार आहेत. यामध्ये भाजपमधून काँग्रेसवासी झालेले नाना पाटोले यांना नागपूर मधून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच राजकीय क्षेत्ररक्षण ठरत असलेल्या नागूपरात पटोलेंना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पाटोले अशी लढत होणार आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलताना गडकरींनी पटोलेंना शुभेच्छा दिल्या आहेत. “नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही” अशे गडकरींनी म्हटले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गडकरी म्हणाले, “राजकारणात प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, मग कोणीही उमेदवार असेल. मी कोणावरही वैयक्तिक टीका-टिप्पणी करणार नाही. काँग्रेस पक्षाला आपला उमेदवार ठरवण्याचा अधिकार आहे. जो उमेदवार असेल त्याने लढावं. मी जे पाच वर्षात काम केलं, त्याच्याच आधारावर लोकांसमोर जाऊन त्यांचा आशीर्वाद मागेन”

नाना पटोले २०१४ मध्ये भाजपच्या तिकिटावर भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह करत भाजपला राम-राम केला. आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)