मुंबई- राज्यात काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या मोठया वाढत आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनाही करोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत स्वतः नाना पटोले यांनी माहिती दिली आहे.
करोनाचीलक्षणं जाणवू लागल्यामुळे मी माझी करोना चाचणी केली असून त्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. तसेच गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या संपर्कात आलेल्यांनी करोना चाचणी करून घ्यावी, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
गेले अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला करोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी करोना चाचणी करवून घेतली. ती चाचणी सकारात्मक आली आहे. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये, अशी माहिती त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.