Nana Patole । Sharad Pawar : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीतील धुसफूस आता समोर येऊ लागली आहे. महाविकास आघाडीत मुख्यमंत्री पदाचा वाद दिवसेंदिवस वाढतच असल्याचं दिसून येत आहे. मात्र, अश्यातच शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदावरून कोणताही वाद नाही आणि याचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल असं देखील सांगितलं आहे.
आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना पवार म्हणाले की, या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला बहुमत मिळेल यात शंका नाही. आमच्या आघाडीत मुख्यमंत्रीपदाचा वाद नाही.
निवडणुकीनंतर विचार करून निर्णय घेऊ. आम्हाला अजून बहुमत मिळालेले नाही, पण बहुमत मिळेल यात शंका नाही. निवडणुका संपल्या की आम्ही मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्यावर बसून चर्चा करू.
त्यामुळे निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा निवडण्याची गरज नाही, असे माझे मत आहे. निवडणुकीनंतर जनतेच्या बहुमताच्या जोरावर आपण सर्व एकत्र बसू आणि आपापसात चर्चा करून मुख्यमंत्रीपदासाठी चेहरा निवडू, असेही पवार म्हणाले.
दरम्यान, शरद पवारांच्या वक्तव्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली. “शरद पवार काही चुकीचं बोलले नाहीत. आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच पुढे जाणार आहोत. संख्याबळ पाहूनच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा फायनल होईल”, असं नाना पटोले म्हणाले.
हे देखील नक्की वाचा…
Sharad Pawar : मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? शरद पवार स्पष्टच म्हणाले, ‘हा निर्णय….’