मुंबई – काँग्रेस नेते नाना पटोले यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष पदी निवड झाली आहे. तर पुण्यातून रमेश बागवे, मोहन जोशी यांची महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे ( Praniti Shinde ) यांच्यावर देखील मोठी जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
INC COMMUNIQUE
Important Notification regarding appointment of Maharashtra PCC President, Working Presidents, Parliamentary Board of Maharashtra PCC and Strategy Screening and Coordination Committee pic.twitter.com/bkQSendfgL
— INC Sandesh (@INCSandesh) February 5, 2021
काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी शिरीष चौधरी, रमेश बागवे, हुसेन दलवाई, मोहन जोशी, रणजीत कांबळे, कैलास गोंरट्याल. बी.एल नगराळे, शरद आहेर, एम.एम शेख, माणिकराव जगताप यांची निवड करण्यात आली आहे.
काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदावर शिवाजी मोघे, बसवराज पाटील, मोहम्मह आरिफ नसीम खान, कुणाल पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.