सत्ताधाऱ्यांनी नागपूरातील जमिनी कवडीमोल भावाने रामदेव बाबाला विकल्या – नाना पटोले

नागपूर – गडकरी यांच्या आशीर्वादाचे मी स्वागत करतो. ते माझे मोठे बंधू आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मी या निवडणुकीत विजयी होईन, असं वक्तव्य काँग्रेसचे नागपूरातील उमेदवार नाना पटोले यांनी केलं आहे. ते नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

नितीन गडकरी विरुद्ध नाना पाटोले अशी लढत नागपूरमध्ये होणार आहे. दरम्यान, दोन दिवसापूर्वी नागपूरमध्ये माध्यमांशी बोलताना गडकरींनी पटोलेंना शुभेच्छा दिल्या होत्या. ते म्हणाले होते की “नाना पटोले यांनी पक्ष सोडला म्हणून आशीर्वाद संपत नाही, त्यांना माझ्या शुभेच्छा.” यावर आज पटोले यांनी गडकरींना उत्तर दिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

तसेच पुढे बोलताना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, सत्ताधारी नागपुरात उद्योगधंदे आणल्याचा दावा करतात, परंतु त्यांनी केवळ येथील लोकांच्या जमिनी रामदेव बाबाला कवडीमोल भावाने विकल्या. तसेच नागपूरात ज्येष्ठ काँग्रेस नेते विलास मुत्तेमवार यांनी उद्योगधंदे आणले असल्याचा दाव देखील पटोले यांनी यावेळी केला.

लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून राजकीय वारे चांगलेच वाहू लागले आहे. काँग्रेसने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्राचे ५ उमेदवार आहेत. यामध्ये भाजपमधून काँग्रेसवासी झालेले नाना पाटोले यांना नागपूर मधून तिकीट देण्यात आले आहे. त्यामुळे भाजपच राजकीय क्षेत्ररक्षण ठरत असलेल्या नागूपरात पटोलेंना मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागणार आहे. नागपूरमध्ये नितीन गडकरी विरुद्ध नाना पाटोले अशी लढत होणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)