नाना पटोलेंचा राजीनामा 

किसान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार

नागपूर – राजीनामा देणाऱ्या कॉंग्रेस नेत्यांच्या यादीत माजी खासदार नाना पटोले यांचाही समावेश झाला आहे. ते शनिवारी किसान कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाले.
अध्यक्षपदाचा राजीनामा देतानाच पटोले यांनी किसान कॉंग्रेसच्या कार्यकक्षेत येणाऱ्या सर्व संघटना बरखास्त केल्या. त्याविषयीचा निर्णय त्यांनी ट्विटरवरून जाहीर केला. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याच्या निर्णयावर राहुल गांधी ठाम आहेत.

पक्षाला आलेल्या अपयशाची जबाबदारी सामूहिक आहे. त्यामुळे मी पदाचा राजीनामा देत आहे. देशहितासाठी आम्ही कॉंग्रेस पक्ष आणि राहुल यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. भाजपला रामराम ठोकून काही महिन्यांपूर्वी पटोले कॉंग्रेसमध्ये दाखल झाले. कॉंग्रेसने त्यांच्यावर विश्‍वास दाखवत त्यांच्यावर किसान कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. यावेळच्या लोकसभा निवडणुकीत पटोले यांना कॉंग्रेसने नागपूरमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याविरोधात रिंगणात उतरवले. मात्र, पटोले यांना पराभूत व्हावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.