मुंबई – भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्वात बोल्ड अभिनेत्री नम्रता मल्लाचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भगवान कृष्णाच्या अवतारात दिसत आहे. तीने इन्स्टाग्राम अकाऊंटवरही हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ जन्माष्टमीच्या दिवसाचा आहे, ज्यामध्ये नम्रता स्टेजवर गोपींसोबत परफॉर्म करताना दिसत आहे. या व्हिडिओवर अनेक युजर्सनी कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
नम्रता बोल्डनेसच्या बाबतीत भोजपुरी इंडस्ट्रीतील सर्व अभिनेत्रींना मागे टाकते. त्यामुळे ती इंटरनेट सेन्सेशनही बनली आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते आणि तिचे बोल्ड फोटो पोस्ट करत असते. तिचे सर्वाधिक फोटो बिकिनीमध्ये असून तिची फॅन फॉलोइंग देखील जबरदस्त आहे.
View this post on Instagram
इंस्टाग्रामवर तिचे दीड दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे नम्रता मल्लाचा फोटो आणि व्हिडिओंवर संमिश्र कमेंट करतात. नम्रताने भगवान कृष्णाच्या अवतारातील हॉट फोटो शेअर केले आहे ज्यावर आता सोशल मीडिया युजर्स संमिश्र कमेंट करत आहे.
View this post on Instagram
भोजपुरी इंडस्ट्रीशिवाय नम्रता मल्ला लवकरच कन्नड चित्रपटही करत आहे. नम्रताचा कन्नड चित्रपट या महिन्यात २६ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर नम्रताने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहे. ज्यामध्ये ती निळ्या रंगाच्या लेहेंग्यात दिसत आहे. चित्रपटाच्या पोस्टरमध्येही तिच्यासारखीच खूपच हॉट दिसत आहे. नम्रता मल्लाने भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादव यांच्यासोबतही काम केले आहे. या