“नमो’ टीव्हीला हिरवा कंदिल 

निवडणूक आयोगाची सशर्त परवानगी

नवी दिल्ली  – निवडणूक आयोगाने नमो टीव्हीचे प्रसारण बंद न करता त्यावर काही निर्बंध घातली आहेत. मतदानापूर्वी 48 तास आधी रेकॉर्डेड कार्यक्रम दाखवू नयेत. कुठल्याही कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण दाखवायला मात्र बंदी नाही. राज्यांच्या निवडणूक आयुक्तांनी नमो चॅनेलवर लक्ष ठेवावे, असेही आयोगाने म्हटले आहे.

याबाबतच्या सूचना निवडणूक आयोगाने राज्य मुख्य निवडणूक आयोगाला दिल्या आहेत. नमो टीव्हीवर निवडणूक काळात फक्त लाईव्ह प्रोग्रामच प्रक्षेपित करता येतील, असे आयोगाने म्हटले आहे. प्रि-रेकॉर्ड केलेले कुठलेही प्रोग्राम दाखविण्यास मनाई करण्यात आली आहे. मीडिया कमिटीने प्रमाणपत्र दिल्याशिवाय नमो टीव्हीवरून कोणत्याही कार्यक्रमांचे प्रक्षेपण न करण्याची ताकीद दिल्लीच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी भाजपला दिली होती. या संदर्भात एक पत्र भाजपला पाठविण्यात आले होते. तसेच, या टीव्हीच्या कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी दोन अधिकाऱ्यांची नेमणूकही केली आहे. नमो टीव्ही हा नमो ऍपचा भाग असल्याचा खुलासा भाजपाने निवडणूक आयोगाकडे केला होता. कॉंग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने याबाबतचा अहवाल मागविला होता. तसेच नमो टीव्हीवर प्रमाणपत्राशिवाय असलेला सर्व मजकूर तत्काळ हटविण्याचे आदेश दिले होते.

लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी नमो टीव्हीची सुरुवात झाली होती. नमो टीव्हीवर पंतप्रधान मोदींच्या सभा दाखवल्या जातात. त्याशिवाय भाजपचे आणखीही कार्यक्रम दाखवले जातात. नमो टीव्ही हे न्यूज चॅनल आहे, असे टाटा स्कायचे म्हणणे होते. पण नंतर मात्र ही एक खास सेवा आहे, असे टाटा स्कायने म्हटले या चॅनलसाठी कोणताही परवाना घेतलेला नाही, असा विरोधकांचा आरोप होता. एखाद्या चॅनलवरून फक्त एकाच पक्षाच्या बातम्या दाखवू शकत नाही, असा आक्षेप घेत विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.