तर ‘नमो अ‍ॅप’ देखील बंद केले पाहिजे- पृथ्वीराज चव्हाण

मुंबई: भारत-चीन सीमारेषा भागातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारकडून चीनच्या 59 अ‍ॅप्सवर बंदी घालण्यात आली. टिक टॉक, शेअर इट, हॅलो, यूसी ब्राऊझर यासारख्या अनेक अ‍ॅप्लिकेशनचा यात समावेश आहे.

दरम्यान, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नमो अ‍ॅप देखील बंद करण्याची मागणी केली.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, १३० कोटी भारतीयांची खाजगी माहिती धोक्यात आहे म्हणून सरकारने ५९ मोबाईल अ‍ॅपवर बंदी घातली. याच निकषावर वापरकर्त्यांची माहिती गोळा करणारे, परस्पर खाजगी सेटिंग बदलणारे आणि वापरकर्त्यांचा डेटा भारताबाहेर परदेशातील कंपन्यांना पाठवणारे नमो अ‍ॅप देखील बंद केले पाहिजे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.