Asaduddin Owaisi । बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोईचे नाव पुन्हा एकदा चर्चेत आहे. अशात काँग्रेस नेते आणि रायबरेलीचे खासदार राहुल गांधी यांना फेसबुकवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सोशल मीडियावर गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोसह धमक्या देण्यात आल्या आहेत.
एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी वाराणसीतील सिगरा पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. एनएसयूआयने सोशल मीडिया वापरकर्त्याविरुद्ध तत्काळ एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधींसोबतच राहुल गांधी तसेच एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याबाबतही असेच म्हटले आहे.
Asaduddin Owaisi । राहुल गांधींना जीवे मारण्याची धमकी
एनएसयूआय पूर्व उत्तर प्रदेशचे अध्यक्ष ऋषभ पांडे यांनी वृत्त माध्यमांना सांगितले की, बुद्धादित्य मोहंती नावाच्या वापरकर्त्याने वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्याबद्दल सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यासोबतच लॉरेन्स बिश्नोईचा फोटो पोस्टमध्ये शेअर कऱण्यात आला आहे.
एनएसयूआयने म्हटले आहे की, “राहुल गांधी प्रत्येक विभागातील लोकांना सोबत घेत आहेत, संविधानाच्या रक्षणाबद्दल बोलत आहेत आणि अशा परिस्थितीत ते देशाची सर्वात मोठी आशा आहेत. त्यांच्याविरोधात असा विचार आम्ही मुळीच खपवून घेणार नाही. एफआयआर व्हावी, अशी आमची मागणी आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीवर लवकरच गुन्हा दाखल करा.