पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे विमानतळाला जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचे नाव देण्याची प्रक्रिया झाली आहे. मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून येत्या कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मांडणार.
तसेच केंद्र सरकारकडेही एक प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्यावर पंतप्रधानांशी बोलून या प्रस्तावाला मंजुरी देण्याबाबतचा विश्वास केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
फडणवीस म्हणाले, पुण्यातील नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याची संकल्पना चांगली आहे. त्याबाबत मी स्वत: सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी सविस्तर चर्चा करून येत्या कॅबिनेटच्या बैठकीत हा प्रस्ताव मांडून त्याला संमती घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात येईल.
त्यावेळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या प्रस्तावाला केंद्रातून मंजुरी घेतल्यावर नाव निश्चित होईल. विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव मिळाल्यानंतर मनापासून समाधान होईल.’
यावेळी गडकरी यांनीही पुण्यातील नवीन विमानतळाचे काम चांगले झाले आहे. या नवीन विमानतळाला जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे नाव देण्याबाबतच्या प्रस्तावाचे स्वागत केले. तसेच, या प्रस्तावाला मंजुरी घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलून मंजूर करून घेऊ.