योगींच्या गोरखपुरातील कोरोना वॉर्डात नाल्याचे पाणी; प्रियंका गांधींनी शेअर केला व्हिडीओ

लखनौ – काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी आज एक व्हिडीओ शेअर करत योगी सरकारवर निशाणा साधला. गांधी यांनी आपण शेअर केलेला हा व्हिडीओ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदारसंघ असलेल्या गोरखपूर येथील वैद्यकीय विद्यालयातील कोविड वॉर्डातील असल्याचे म्हंटले आहे. या व्हिडिओमध्ये कोरोना रुग्ण उपचार घेत असलेल्या वार्डात नाल्याचे पाणी शिरल्याचे दिसत आहे.

या व्हिडिओसोबतच प्रियंका गांधी यांनी, ‘हा व्हिडीमुळे योगी सरकार दावा करत असलेल्या परिस्थितीपेक्षा वास्तवातील परिस्थिती किती भयावह आहे याची प्रचिती येते. हा व्हिडीओ मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मतदार संघ असलेल्या गोरखपूर येथील वैद्यकीय विद्यालयातील आहे. नाल्याचं पाणी रुग्णालयात शिरल्याने रुग्ण हैराण आहेत मात्र पाणी बाहेर काढण्याची कोणतीही सोया नाहीये.’ असा आरोप लगावला आहे.

या ट्विटसोबत त्यांनी आणखी एक ट्विट केलं असून त्यामध्ये त्यांनी, ‘आज गोरखपुरातील एका कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर १६ तास उलटल्यानंतरही त्याचे शव घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका न मिळाल्याचे वृत्त आहे.’ असा दावा केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.