सिडनी : बर्फ अतिशय थंडगार असल्यामुळे कोणीही दीर्घकाळ बर्फ हातातही घेऊ शकत नाही पण ऑस्ट्रेलियातील एका माणसाने एकही कपडा परिधान न करता अनेक तास बर्फात राहण्याचा विक्रम करून दाखवला आहे.
जोसेफ रॉबर्ट असे या माणसाचे नाव असून त्याने शनिवारी या विक्रमाची नोंद केली काचेच्या बंद बॉक्स मध्ये असलेल्या बर्फाच्या ढिगात तो तब्बल अडीच तास विवस्त्रावस्थेत बसून राहिला होता या बॉक्समध्ये तब्बल दोनशे किलो बर्फ होते अडीच तास या बॉक्समध्ये व्यतीत त्याने स्वतःलाच पूर्वीचा विक्रम मोडला आणि नव्या विक्रमाची नोंद केली. यापूर्वी असा विक्रम त्याने ३० मिनिटांसाठी केला होता.
आपल्या विक्रमाविषयी बोलताना जोसेफ म्हणतो मनातील सकारात्मक भावनेच्या जोरावरच मी हा विक्रम करू शकलो अर्थात मला लोकांचाही खूप पाठिंबा मिळालाया बर्फाच्या बंद बॉक्समधून जोसेफ जेव्हा बाहेर आला तेव्हा प्रथम त्याने सूर्याच्या प्रकाशाचा आनंद घेतला अमेरिकेत लॉस एंजल्स येथे अशाच विक्रमाची नव्याने नोंद करण्याची त्याची इच्छा आहे.