नक्षलग्रस्त भागात दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान 

गडचिरोली- चिमूर, गोंदिया या लोकसभा मतदार संघातील दुर्गम भागात असणाछया आमगाव, आरमोरी, गडचिरोली, अहेरी आणि अर्जुनी मोरगाव या विधानसभा मतदार संघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. आयोगाने निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी तीन हेलिकॉप्टर्स तैनात केली आहेत. गेल्या निवडणुकीत मतदानानंतर नक्षलींनी हल्ला करून निवडणूक प्रक्रियेला गालबोट लावले होते. यापाश्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेने यावेळी अधिक खबरदारी घेतली आहे.

वर्धा मतदारसंघ 
– 2 हजार 26 एवढे मतदान केंद्र,
– 8 लाख 93 हजार पुरुष तर 8 लाख 48 हजार महिला मतदार – एवूैण 17 लाख 41 हजार मतदार आहेत.

रामटेक मतदारसंघ 
– 2 हजार 364 मतदान केंद्र
– 9 लाख 96 हजार पुरुष तर 9 लाख 24 हजार महिला मतदार – एकूण 19 लाख 21 हजार मतदार आहेत.

नागपूर मतदार संघ 
– 2 हजार 65 मतदान केंद्र
– 10 लाख 96 हजार पुरुष तर 10 लाख 63 हजार महिला मतदार – एकूण 21 लाख 60 हजार एकूण मतदार आहेत.

भंडार-गोंदिया मतदारसंघ 
– 2 हजार 184 मतदान केंद्र
– 9 लाख 5 हजार पुरुष तर 9 लाख 3 हजार महिला मतदार – एकूण 18 लाख 8 हजार मतदार आहेत.

गडचिरोली-चिमूर मतदारसंघ 
– 1 हजार 881 मतदान केंद्र
– 7 लाख 99 हजार पुरुष आणि 7 लाख 80 हजार महिला मतदार – एकूण 15 लाख 80 हजार मतदार आहेत.

चंद्रपूर मतदारसंघ 
– 2 हजार 193 मतदान केंद्र
– 9 लाख 86 हजार पुरुष आणि 9 लाख 22 हजार महिला मतदार – एकूण 19 लाख 8 हजार मतदार आहेत.

यवतमाळ-वाशिम मतदारसंघ 
– 2 हजार 206 मतदान केंद्र आहेत.
– 9 लाख 93 हजार पुरुष मतदार तर 9 लाख 21 हजार महिला मतदार – एकूण 19 लाख 14 हजार मतदार आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.