नेलपेंट लावण्याचे फॅशन झाले जुने, ट्रेंडमध्ये ही हटके फॅशन

मुंबई –  महिलावर्गात नेल आर्ट करण्याची क्रेझ जरा जास्तच रंगलेली दिसत होती. सोशल मीडिया साइट्‌सवर तर नेल आर्टचे खास पेजसुद्धा आहेत. त्यांना तरुणी आणि महिलावर्गाकडून मिळणाऱ्या लाइक्‍स तर हजारोंच्या घरात आहेत. आकर्षक रंग आणि डिझाइन्स वापरून नखांवर केलेली ही कलाकुसर सगळ्यांनाच भुरळ पाडत असते. आपल्या नखांवरही अशा पद्धतीचं नेल आर्ट करून घेण्याची इच्छा एखादीला झाली नाही तर नवलच.

मात्र नेल आर्ट पेक्षा सध्या नेल एक्‍सटेंशनला महिला वर्गात चांगली पसंती मिळत आहे. नेल आर्ट प्रमाणे नेल एक्‍सटेंशन करून घेणं खूप खर्चिक आहे. पण ज्या महिलांचे नेल वाढत नाही किंवा आकर्षक दिसत नाही त्या महिला एखाद्या प्रोफेशनलकडून नेल एक्‍सटेंशन करून घेतात.

नेल एक्‍सटेंशनमध्ये दोन पर्याय आहेत. एक म्हणजे छोटी डिझाइन्स आणि दुसरं म्हणजे वेगवेगळ्या डिझाइन्स केलेल्या नखांच्या आकारातले स्टिकर्स. यातल्या छोट्या डिझाइन्समध्ये फ्लोरल प्रिंट, कार्टून, वेगवेगळ्या प्राण्यांच्या, माणसांच्या, पक्ष्यांच्या आकारातल्या नक्षीदार प्रिंट, मेंदीवरची अरेबिक नक्षी असं बरंच काही तुम्हाला पाहायला मिळेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)