Nagpur South West Constituency । महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघ खूप चर्चेत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे या जागेसाठी उमेदवार आहेत. त्यांच्यासमोर काँग्रेसने प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना उमेदवारी दिली आहे. या दोघांशिवाय या निवडणुकीत आणखी 10 उमेदवार रिंगणात आहेत. दरम्यान , या मतदार संघातील ताजी आकडेवारी समोर आली असून याठिकणी भाजपचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांनी आघाडी मिळवली आहे.
नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातील आकडेवारी समोर आली असून याठिकणी तिसऱ्या फेरी अखेर देवेंद्र फडणवीस हे आघाडीवर आहेत. या फेरीअखेर मताधिक्य वाढले आहे. त्यांना तिसऱ्या फेरी अखेर ६ हजार ८११ मतांची आघाडी मिळाली आहे.
फडणवीस पाच वेळा आमदार Nagpur South West Constituency ।
देवेंद्र फडणवीस गेल्या पाच वेळा नागपूरचे आमदार आहेत. फडणवीस 1997 मध्ये नागपूरचे महापौर झाले आणि दोन वर्षांनी 1999 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली. तेव्हापासून ते सातत्याने निवडणुका जिंकत आहेत. यावेळी फडणवीस सहाव्या विजयाची वाट पाहत आहेत.
गेल्या दोन निवडणुकांमध्ये फडणवीस मोठ्या फरकाने विजयी झाले Nagpur South West Constituency ।
फडणवीस यांनी मागील दोन निवडणुका मोठ्या मताधिक्याने जिंकल्या आहेत. 2019 मध्ये त्यांनी काँग्रेसचे आशिष देशमुख यांचा 49 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला. फडणवीस यांना १०९२३८ तर देशमुख यांना ५९८३८ मते मिळाली. 2014 च्या निवडणुकीत फडणवीस यांनी काँग्रेसचे प्रफुल्ल गुडधे पाटील यांचा 58 हजारांहून अधिक मतांनी पराभव केला होता.
यावेळी फडणवीस यांच्या विरोधात काँग्रेसने मराठा समाजाचे प्रफुल्ल विनोदराव गुडधे यांना उमेदवारी दिली आहे. गुडधे हे राजकीय कुटुंबातून आलेले आहेत. त्यांचे वडील विनोद गुडधे हे नागपुरातून भाजपचे पहिले आमदार आणि मंत्री राहिले आहेत.