Nagpur Psychiatric Attack । नागपूरमधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. याठिकाणी रेल्वे स्थानकावर हत्येचा थरार पाहायला मिळाला. एका व्यक्तीने चार जणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांचा मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. नागपूर रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म नंबर सातवर ही धक्कादायक घटना घडली.नागपूर लोहमार्ग पोलिस याप्रकरणाचा तपास करत आहेत.
दोघांचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी Nagpur Psychiatric Attack ।
समोर आलेल्या माहितीनुसार, “नागपूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर सातवर एका मनोरुग्ण व्यक्तीने चौघांवर हल्ला केला. आरोपी मनोरुग्ण या चौघांनाही मारत सुटला होता. रेल्वेच्या रुळात उपयोगात येणाऱ्या लाकडी राफटरने आरोपी त्यांच्यावर हल्ला करत होता. या हल्ल्यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.।
रेल्वे कर्मचाऱ्यांनी पाठलाग करत आरोपीला पकडले Nagpur Psychiatric Attack ।
रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी हालवले. जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. गणेश कुमार डी (५४ वर्षे राहणार दिंडीगुल, तामिळनाडू) असे मृत प्रवाशाचे नाव आहे. तर दुसऱ्या मृतकाची ओळख अद्याप पटलेली नाही. हल्ल्यानंतर आरोपीने घटनास्थळावरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पण रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वे रुळावर आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. जयराम रामअवतार केवट (३५ वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. नागपूर पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत.