Nagpur Crime : पैशांचा पाऊस पाडण्याचं अमिष दाखवून अल्पवयीन मुलीचं लैगिक शोषण, भोंदूबाबाची टोळी अटकेत

नागपूर : पैशांचा पाऊस पाडण्याचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरात घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबासह त्याच्या चार सहकाऱ्यांना अटक केली आहे. डी आर उर्फ सोपान कुमरे असं अटक केलेल्या भोंदूबाबाचं नाव असून विक्की खापरे, दिनेश निखारे, रामकृष्ण म्हसकर आणि विनोद मसराम अशी त्याच्या सहकाऱ्याची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अल्पवयीन मुलीची भोंदूबाबाच्या टोळीतील विक्की खापरे सोबत ओळख झाली होती. आपल्याला एका बाबाकडे जायचे आहे ते तांत्रिक शक्तीने पैशांचा पाऊस पाडतात त्यामुळे तुला आणि तुझ्या कुटुंबियांना पैसे मिळतील असे अमिष खापरेने दाखवले.

मुलीने त्याच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला. मात्र नंतर सर्व प्रकार पाहून तिला शंका आली आणि तिने नागपूर पोलिस गुन्हे शाखेत वरिष्ठ अधिकाऱ्यांना घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून नागपूरातील चिमूर येथील शेतात छापा टाकून भोंदूबाबाला ताब्यात घेतले.

भोंदू बाबा सुरूवातील तो मी नव्हेच चा पाढा मोजत होते. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या मोबाईलमध्ये अनेक मुलींचे फोटो सापडले आहेत. यावरून त्याने यापुर्वीदेखील अनेक मुलींचे शोषण केल्याची शक्यता आहे. पोलिसांनी त्याच्यासह त्याच्या चार साथिदारांनाही अटक केली आहे. त्याने काही तरुणांना हाताशी धरले होते. मुलींना फसवूण आणण्यासाठी तो त्यांना मोठी रक्कम देत असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे.

पोलिसांचे नागरिकांना आवाहन –

अनेक कारणांसाठी काही लोक भोंदूबाबाकडे जातात व त्यांचे लैंगिक, आर्थिक शोषण होते. गेल्या काही दिवसांत अशी अनेक प्रकरणे घडली आहेत. त्यामुळे नागिरकांनी भोंदूबाबापासून सावध राहावे. जर तुमच्यासोबत असे काही घडत असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.