नागपूर मेट्रो आजपासून सेवेत : पंतप्रधान मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उद्‌घाटन

नागपूर : हा प्रकल्प पूर्ण होईल तेव्हा नागपूरचा मोठा जनसामुदाय मेट्रोने प्रवास करेल. देशात अनेक मेट्रो आहेत. परंतु नागपूर मेट्रो देशातील पहिली ग्रीन मेट्रो आहे. नागपूर हे देशातील वेगाने विकसित होणारे एक शहर आहे. इथली लोकसंख्या वाढणार आहे. त्यामुळे मेट्रो प्रकल्प अत्यंत गरजेचा आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

बहुप्रितिक्षीत नागपूर मेट्रोचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. मोदी म्हणाले, ऑरेंज सिटी नागपूरचे “माझी मेट्रो’साठी खूप अभिनंदन. याप्रसंगी मला दुप्पट आनंत होत आहे. मी या मेट्रोचे भूमिपूजन केले आणि आज मीच या प्रकल्पाचे उद्‌घाटन करत आहे. या मेट्रोमुळे नागपूरमधील परिवहनामध्ये खूप बदल होणार आहेत. नागपूर मेट्रो निर्माण होत असताना नागपूरमध्ये 20 हजार तरुणांना रोजगार दिला.

नागपूर असो किंवा मुंबई असो आम्ही 21 व्या शतकात गरजेची असलेली वाहतूक प्रणाली लोकांच्या सेवेत दाखल करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आमच्या सरकारने त्यासाठी अनुकूल अशी पॉलिसी आणली, ज्यामुळे मेट्रो बनवण्याची गती वाढली आहे.

जून महिन्यात मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या उद्‌घाटनाला मी यावे, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आमंत्रण मी स्वीकारत आहे. पुढच्या टप्प्याच्या उद्‌घाटनाला मी पुन्हा नागपूरमध्ये येईन, असे त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)