नागपूर – 5 जुलै रोजी तोंडावर कापड बांधून आलेल्या चोरट्यांनी बंदूकीचा धाक दाखवत नागपूरातील अवनी ज्वेलर्समध्ये शिरून दरोडा टाकला होता. ज्वेलर्स लुटीचा व्हिडिओ समोर आला आहे. शहरातील नारा भीम चौकात हा प्रकार घडला होता.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/969251007222571
ज्वेलर्सच्या दरोड्यामध्ये चोरट्यांनी 7 तोळे सोने, चांदी सह एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल लुटून पसार झाले होते. याप्रकरणी मालक आशिष नावरे यांनी नागपूर पोलिसात तक्रार दाखल केली होती. नागपूर पोलिसांना चार पैकी दोन आरोपींना अटक केली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.
तोंडावर कापड बांधून आलेल्या चार मोटारसायकलस्वारांनी अवनी ज्वेलर्समध्ये शिरून मालक आशिष नावरे यांना बंदूकचा धाक दाखवत बंधक बनवले होते. यानंतर दुकानातील 7 तोळे सोने, चांदी सह एकूण बावीस लाखांचा मुद्देमाल लुटून पसार झाले होते.लुटुच्या दरम्यान आरोपीने मालक आशिषला मारहाण केली आणि आवाज होऊ नये तोंडावर पट्टी बांधून दुकान बंद केले होते. दरम्यान, लुटाचा हा सर्व प्रकार दुकानातील सीसीटीव्हीत कैद झाल्याचे वृत्त एका वृत्तवाहीने दिले आहे.
आरोपी वीरेंद्र यादव व दीपक त्रिपाठी यांना अटक केली आहे. यांना महाराष्ट्र व मध्य प्रदेश पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाई करत मध्यप्रदेशच्या कटणी भागातून अटक करण्यात आली आहे. इतर दोन आरोपी फरार झाले असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. विशेष म्हणजे या प्रकरणात मुख्य आरोपीची प्रेयसी देखील आरोपी आहे, तिनेच दरोडेखोरांना टीप दिली होती. तिला देखील पोलिसांनी अटक केली आहे.